भारताचा यशस्वी कर्णधार

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची ओळख आहे. पण तितकाच तो जंटलमॅनदेखील आहे.

धोनीचा मोठा चाहतावर्ग

इतर कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा धोनीचा चाहतावर्ग मोठा आहे. आयपीएलच्या स्पर्धेत त्याचा अनुभव आला.

गुजरातपेक्षा धोनीचे चाहते

आयपीएलचा अंतिम सामना अहमबादला असतानाही गुजरात टायटन्सपेक्षा धोनीला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांची संख्या दुप्पट होती.

गुडघ्यावर शस्त्रक्रिया

आयपीएलच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात धोनीच्या गुडघ्यावर तज्ज्ञ डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

व्हिडिओ व्हायरल

यादरम्यान, महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकं त्याचं कौतुक करत आहेत.

चाहत्याबरोबर सेल्फी

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत धोनी कारमध्ये बसला असून भर रस्त्यात तो एका चाहत्याला कार थांबवून सेल्फी देताना दिसतोय.

भर रस्त्यात थांबवली कार

स्कुटरवर असणाऱ्या चाहत्याने धोनीबरोबर सेल्फीची इच्छा व्यकत केली. धोनीने लगेच कार थांबवत काच खाली घेऊन चाहत्याबरोबर सेल्फी घेतला.

श्रीभगवद्गीता हातात

त्याआधी धोनीचा कारमध्ये हातात श्रीभगवद्गीता गीता घेतलेला फोटो व्हायरल झाला होता.

दुखापतीसह खेळला

धोनीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीसह तो आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळला होता.

VIEW ALL

Read Next Story