आयपीएल 2024 स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघांची लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएलला सुरु होण्यापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. यात काहींनी रंग बदलला आहे. तर काहींनी जर्सीच्या डिझाईनमध्ये बदल केला आहे.
लखनऊ सुपरजायंट्सने यंदाच्या गडद निळ्या रंगाची जर्सी निवडली आहे. यात निळ्या रंगाच्या रेषाही पाहायला मिळत आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएल जर्सीच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यांची जर्सी निळ्या आणि लाल रंगाची आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या नव्या जर्सीमध्ये जांभळा आणि सोनिरी रंग पाहायला मिळत आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या यंदाच्या जर्सीसाठी गुलाबी आणि निळ्या रंगाची निवड केली आहे.
गुजरात टायटन्सने देखील त्यांनी जर्सी नव्या अंदाजात लाँच केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद या संघाने यंदाच्या जर्सीत पूर्णपणे बदल केला आहे. त्यांची जर्सी केशरी रंगाची असून त्यावर काळ्या रंगाचे रेषा पाहायला मिळत आहेत.
पंजाब किंग्सने त्यांची नवीन जर्सी लाँच केली. यंदाच्या आयपीएलसाठी पंजाब किंग्सने गडद लाल रंगाची निवड केली आहे. तसेच यात निळ्या रंगाचीही झलक दिसत आहे.
मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या जर्सीत निळ्या आणि गोल्डन रंगाची शेड पाहायला मिळत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने यंदाच्या आयपीएलसाठी नवीन जर्सी लाँच केली आहे. यात प्रामुख्याने लाल आणि निळ्या रंगाचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चेन्नई सुपर किंग्ज संघाची जर्सी पिवळ्या रंगात पाहायला मिळत आहे.