बिर्याणी एक, प्रकार अनेक; ही 12 नावं वाचूनच भूक लागेल

Mansi kshirsagar
Jan 01,2025

हैदराबादी बिर्याणी (तेलंगणा)

हैदराबादी बिर्याणी ही बासमती भात, मटण आणि विविध मसाले वापरुन केली जाते. यात पक्की आणि कच्ची असे दोन प्रकार येतात. कच्ची म्हणजे कच्च मटण भातावर पसरवून बिरयानी केली जाते. तर दुसऱ्या प्रकारात शिजवलेले मटण पसरवले जाते. हैरदाबादी बिर्याणी ही हैदराबादच्या निझामशाहीच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवते

लखनऊ बिर्याणी (उत्तर प्रदेश)

या बिर्याणीला अवधी बिर्याणी असंदेखील म्हणतात. याची रेसिपी लखनऊच्या राजेशाही घरातून आलीये. लखनऊ बिर्याणी ही प्रामुख्याने 'दम' या प्रोसेसने शिजवली जाते. यात मटण, शिजवलेला भात आणि केसर प्रामुख्याने वापरतात.

कोलकत्ता बिर्याणी (प. बंगाल)

कोलकत्ता बिर्याणी ही थोडी गोडसर असून यावरही थोडा अवधी खाद्यसंस्कृतीचा प्रभाव जाणवतो. या बिर्याणी बटाटे वापरण्यात येतात. त्याचबरोबर उकडलेली अंडीदेखील वापतात.

मलबार बिर्याणी (केरळा)

मलबार बिर्याणीसाठी तुकडा तांदुळ वापरला जातो. तसंच, प्रामुख्यात यात तूप आणि खोबऱ्याचे वाटण वापरण्यात येते. कधी कधी यात मटणाऐवजी मासे, कोलंबी, चिकनदेखील वापरले जातात.

अंबूर बिर्याणी (तामिळनाडू)

अंबूर बिर्याणी ही शीरगा सांबा तांदुळ वापरुन केली जात असून ती तामिळनाडूची खासियत आहे. यात अनेक प्रकारचे मसाले वापरते जातात तसंच यात चिकन दह्यात मॅरिनेट करुन बिर्याणी केली जाते

थलासॅरी बिर्याणी (केरळा)

थलासॅरी बिर्याणी ही तुकडा तांदुळ वापरुन केली जाते. यात तळलेला कांदा, काजू, मनुका वापरुन केली जाते. ही बिर्याणी एकाच भांड्यात तांदुळ आणि भात शिजवून केली जाते.

डिंडीगुल बिर्याणी (तमिळनाडू)

चवीला आंबट-तिखट असलेली ही बिर्याणी श्रीगा सांबा भात वापरुन केली जाते. यात दही आणि लिंबाचा रस जास्त वापरला जातो. तसंच, मटण आणि चिकन चौकोनी तुकड्यात कापले जातात.


सिंधी बिर्याणी ही कलरफुल आणि तिखट असले. यात दही, बटाटे, टोमॅटो आणि जर्दाळु वापरले जातात. त्यामुळं बिर्याणीला थोडा आंबट-गोड फ्लेवर येतो.

भटकल बिर्याणी (कर्नाटका)

ही बिर्याणी कर्नाटकाची स्पेशालिटी आहे. यात भाताच्या लेअर आणि मटण मॅरिनेट करुन केली जाते. यात हिरव्या मिरच्या, कांदा आणि टोमॅटो वापरले जातात

बॉम्बे बिर्याणी

मुंबईत मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी मिळते. यात बटाटे, केवड्याचे पाणी आणि ड्रायफुट्स वापरले जातात. गोड-तिखट असे मिक्स कॉम्बिनेशन पाहायला मिळते.

मेमोनी बिर्याणी

मेमोनी बिर्याणी ही मेमन समुदायात प्रामुख्याने करण्यात येते. यात मसाले, तेल,तूप खूप कमी प्रमाणात वापरण्यात येते. तसंच,मटण, दही आणि बटाटे वापरण्यात येतात.


काश्मिरी बिर्याणीत केसर, ड्रायफ्रुट्स आणि नट्स वापरले जातात. यात वापरले जाणारे चिकन किंवा मटण दही वापरुन शिजवले जाते.

VIEW ALL

Read Next Story