55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण
अभिनेत्री भाग्यश्री तिच्या सौंदर्य, हेल्थ आणि फिटनेससाठी चर्चेत असते.
हेल्दी इटींग, एंटी एजिंगपासून, स्किन केअर वर्कआऊटबाबत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
55 वर्षीय भाग्यश्रीच्या फिटनेस आणि एजलेस ब्युटी पाहून प्रत्येक जण अवाक् होतो.
डोळ्यांखाली किंवा पायांमध्ये झिनझिणी येत असेल तर मॅग्नेशियमची कमतरता असते.
यासाठी बदाम, सुर्यफुलाच्या बीया, पालकाचा आहारात समावेश करावा.
तुम्हाला चिडचिडेपणा किंवा राग येत असेल व्हिटामीन बी ची कमतरता असते.
या उपाय म्हणजे राजमा, छोले, शेंगदाणे यांचे सेवन करावे.
नखं तुटणं हे आयर्नच्या कमतरतेचं लक्षण असल्यामुळे पालक, बीट, गुळाचे सेवन केले पाहिजे.
मांसपेशीच्या विकासासाठी पोटॅशियमसाठी केळी, नारळपाणी, बटाटा खावा.
त्वचेच्या पेशींना पोषण आणि दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी बदामाचे सेवन करावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)