वॉशिंग मशीन वापरताना 'या' चुका टाळा! महागडे मशीन होईल खराब; वीजबिलही येईल जास्त
एकाच वेळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे योग्य नाही.
कारण यामुळे वॉशिंग मशीनमध्ये लोड येऊ शकते.
मशीनमध्ये भार पडतो आणि ज्यामुळे त्याचे पार्ट्स खराब होऊ शकतात.
मशीन खडबडीत पृष्ठभागावर ठेवणे टाळा. ज्यामुळे मशीनवर जास्त लोड येतो. त्यावर अतिरिक्त दबाव पडतो.
वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना त्यात जास्त प्रमाणात डिटर्जंट टाकणे टाळा. डिटर्जंटचा जास्त प्रमाणात वापर केल्याने फेस तयार होतो. ज्यामुळे वॉशिंग मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
कपडे न तपासता मशीनमध्ये टाकू नका. कपड्यामध्ये नाणे, किंवा कागदपत्रे असतात. ज्यामुळे वॉशिंग मशीन लवकर खराब होऊ शकते.