काळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?

Pooja Pawar
Oct 07,2024


हळद हा किचनमधील सर्वात उपयुक्त पदार्थ असून याचा वापर हा जेवणात तसेच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतो.


तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?


काळी हळद प्रामुख्याने भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पिकवली जाते. याचा वापर अधिकतर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.

पोटाचे आजार :

काळी हळद ही पोटाच्या आजारांवर गुणकारी ठरते. काळ्या हळदीची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पोटदुखी आणि गॅसच्या समस्येवर आराम मिळतो.

सांधेदुखी :

काळी हळद सांधेदुखीच्या समस्येपासून आराम देते. सांधेदुखीच्या वेदना वाढू लागल्यावर काळ्या हळदीची पेस्ट त्यावर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.


काळी हळद ही अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे.


काळी हळद ही त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरते. काळी हळदमध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो आणि पिंपल्स पासून सुद्धा सुटका मिळते.


किरकोळ जखम, त्वचा सोलवटणे यासाठी सुद्धा तुम्ही काळ्या हळदीचा लेप वापरू शकता. यामुळे जखम लवकर बारी होण्यास मदत होते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story