त्वचेपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत; रेड वाईन पिण्याचे एक ना अनेक फायदे

रिलॅक्सिंग ड्रींक

जाणकारांच्या मते रेड वाईन एक रिलॅक्सिंग ड्रींक असून, प्रत्येक वयोटातील व्यक्तीला ती आवडते. यामध्ये असणाऱ्या अँटी-ऑक्‍सीडेंट्स आणि अँटी एजिंग घटकांमुळे वाढत्या वयाची चिन्हं चेहऱ्यावर दिसत नाहीत.

घटक

रेड वाईन एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, प्रोलॅक्टिन आणि थायरॉईडसारख्या हार्मोनवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

बॅड कोलेस्ट्रॉल

रेड वाईन प्यायल्यानं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन त्यामुळं हृदयाचं आरोग्य सुधारतं. इथं पॉलिफेनॉल्सटची मदत होते.

रेस्‍वेराट्रोल

काळ्या द्राक्षांपासून तयार केल्या जाणाऱ्या रेड वाईनमध्ये रेस्‍वेराट्रोल असल्यामुळं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. टाईप 2 डायबिटीज असणाऱ्या महिलांसाठी रेड वाईन फायद्याची.

अँटी इंफ्लेमेटरी गुण

रेड वाईनमुळं तणाव दूर होतो. शिवाय त्यातील अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे सांधेदुखी दूर होते, चांगली झोप लागते.

अतिरेक टाळावा

रेड वाईनचे अनेक फायदे असले तरीही ती पिताना अतिरेक टाळावा. उपाशी पोटी वाईन पिऊ नये. वाईन पिताना कायम सोबत स्नॅक्स खावेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story