घरी बनवलेल्या पनीरचे पाणी फेकून देण्याची चूक करताय, हे फायदे वाचाच!
पनीरचे भाव खूप वाढले आहेत. म्हणून हल्ली पनीर घरीच बनवले जातात
पनीर बनवल्यानंतर ते शिल्लक राहिलेले पाणी फेकून देतात. मात्र तुम्ही ही चुक करु नका
पनीरचे शिल्लक राहिलेले पाणी तुम्ही केसांना लावू शकता ज्यामुळं केसांना चमक येते
पनीरचे पाणी तुम्ही टोनर म्हणूनही वापरू शकता. यामुळं त्वचा तजेलदार राहते
पनीरचे पाणी प्यायल्यामुळं हाडांना बळकटी येते, पाचनसंस्था मजबूत होते
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पनीरचे पाणीदेखील पिऊ शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)