विविध प्रकारची, विविध चवींची कॉफी पिण्याचा अनेकांचाच छंद आणि आवड.
तुम्हाला माहितीये का, एक कॉफी अशी आहे ज्यामध्ये चक्क अंड मिसळलं जातं.
व्हिएतनाम या देशामधील कॉफीचा हा प्रकार जगभरात लोकप्रिय आहे.
अंड्याच्या या कॉफीला Ca phe trung असंही म्हणतात. या कॉफीमध्ये शरीराला गुणकारी घटक आढळतात.
या कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मही आढळतात. असं असलं तरीही कॉफीसोबत कॅफिन असणाऱ्या वस्तूंच्या सेवनानं पचनक्रीया बिघडते.
अशा पदार्थांचं वारंवार सेवन केल्यास पोटदुखीची समस्या उदभवून शरीरात पोषक तत्त्वं कमी होतात.
तुम्हीही जर कॉफीप्रेमी असाल, तर या कॉफीची चव नक्की घ्या. पण अतिसेवन मात्र टाळा.