पोहे ग्लूटन फ्री असल्यामुळं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि घटवण्यासाठी त्यांची मोठी मदत होते. पोह्यांमध्ये असणाऱ्या फायबरमुळं ते अधिक आरोग्यदायी ठरतात.
फक्त कांदेपोहेच नव्हे, गुळासोबतही पोह्यांचं सेवन आरोग्यदायी ठरतं.
पोह्यांच्या सेवनामुळं हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. शिवाय यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि विटामिन शरीराला आवश्यक त्या सर्व घटकांची पूर्तता करतात.
पोह्यांच्या सेवनामुळं शरीराला उर्जा मिळून मेटाबॉलिजम वाढतं. पोहे अधिक आरोग्यदायी करण्यासाठी त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मटर, ब्रोकोली अशा भाजांचा वापर केल्यासही फायदा होतो.
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये पोहे एक संतुलित आहार/ न्याहारी समजला जातो.
थोडक्यात डाएटवर असतानाही योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात पोहे खाल्ल्यास त्याला बहुतांशी फायदाच होतो. (वरील माहिसी सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)