मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात.
या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.
जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.
कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.
मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.
कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.
मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.