आचार्य चाणक्य म्हणतात की, पत्नीसंबंधित काही गोष्टी आहेत ज्या कधीच चारचौघात बलू नयेत.
एखादा लग्न झालेला व्यक्ती त्याच्या पत्नीचे वाईट गुण तिसऱ्या व्यक्तीला सांगत असेल तर हे चुकीचं आहे.
जो व्यक्ती ही चूक करतो तो व त्याची पत्नी हे समाजात चेष्टेचा विषय ठरतात
चाणक्य म्हणतात, पती-पत्नी कितीही कष्टात व दुखात असतील तरी त्यांनी बाहेरील व्यक्तीला या गोष्टी सांगणे टाळावे
दुसऱ्यांसमोर आपली कमकुवत बाजू सांगितली तर लोक त्याचा चुकीचा फायदा घेतात
यामुळं पती-पत्नीच्या सन्मानावर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित होऊ शकते
चाणक्य म्हणतात की काही गोष्टी या घराच्या चार भिंतीच्या आतच ठेवाव्यात.
जर बाहेरच्या लोकांना या गोष्टी कळल्या तर त्याचा चुकीचा प्रभाव पडण्यास सुरुवात होते. त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो