दीड लाखांचा घोडा, 2 लाखांचा कुत्रा अन्..; या 8 सेलिब्रिटींकडे आहेत महागडे पाळीव प्राणी

अनुष्काकडे कुत्र्यांची जोडी

अनुष्का शर्माकडे एक लॅब्राडोर आणि बिग कुत्रांची जोडी 75 हजारांची आहे.

किंग खानकडे खास कुत्रा

शाहरुख खानकडील जापनीज चीन डॉग हा 1 लाखांचा आहे.

शिल्पाकडे लाखो रुपयांचा कुत्रा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे पिकिंग्सी प्रजातीचा कुत्रा असून त्याची किंमत 1.9 लाख रुपये इतकी आहे.

दिशा पटाणीकडे 4 पाळीव प्राणी

दिशा पटाणीकडे एकूण 4 पाळीव प्राणी आहेत. यात 2 कुत्रे आणि 2 मांजरी आहेत. या प्राणींची किंमत 60 हजार रुपये इतकी आहे.

श्रद्धाकडे स्पेशल कुत्रा

श्रद्धा कपूरकडे लाहसा अॅप्सो प्रजातीचा कुत्रा आहे. या कुत्र्याची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे.

महिन्याला खर्च करते 50 ते 60 हजार

जॅकलीन फर्नांडिसकडे एकूण 7 कुत्रे आहेत. तसेच तिच्याकडे 2 पर्शियन मांजरी आणि 5 फिश टँक आहेत. महिन्याला जॅकलीन या प्राण्यांसाठी 50 ते 60 हजारांचा खर्च करते.

सलमानकडे अनेक कुत्रे

सलमान खानकडे डग्लस दी बॉड्रेक्स, नेपोलीटन मास्टीफ आणि बूल मास्टीफ कुत्रे आहेत. या कुत्रांची एकूण किंमत 2 लाखांहून अधिक आहे.

धोनीकडे दुर्मिळ घोडा

महेंद्र सिंह धोनीच्या रांची येथील फार्महाऊसमध्ये शेल्टलॅण्ड प्रजातीचा घोडा आहे. या घोड्याची किंमत 1.3 लाख रुपये इतकी आहे. या घोड्याचं नाव चेतक असं ठेवण्यात आलं आहे.

धोनीकडे एकूण 6 कुत्रे

धोनीकडे 6 कुत्रे आहेत. या कुत्र्यांची एकूण किंमत 5 लाखांपर्यंत असल्याचं समजतं.

VIEW ALL

Read Next Story