मराठी भाषिक असलो तरी अनेकदा दररोजच्या व्यवहारांमध्ये इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर केला जातो.
रोजच्या वापरातले असे काही इंग्रजी शब्द आहेत ज्यांना मराठीत पर्यायी शब्द असेल याचा कोणी विचारच करत नाही.
बँकेत मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी अनेकदा चेकचा वापर केला जातो.
बँकेत खात उघडल्यावर खाते धारकाला एटीएम कार्ड, बँक पासबुक सह चेकबुक सुद्धा दिले जाते.
बँके खात्यातून पैसे काढण्यासाठी, पैसे डिपॉझिट तसेच इतर व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही चेकचा वापर केला जातो.
मोठ्या रकमेची देवाण-घेवाण किंवा अशा व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी लोक नेहमीच चेकद्वारे व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
ज्या व्यक्तीला तुम्ही चेकद्वारे पैसे देऊ इच्छिता अशा व्यक्तीचे नाव तुम्हाला चेकवर लिहावे लागते. तसेच दिनांक, रक्कम आणि सही करून चेक संबंधित व्यक्तीला किंवा बँकेत दिला जातो.
बँकेच्या चेकला मराठीत 'धनादेश' असं म्हंटल जातं. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत चेकसाठी 'धनादेश' हा शब्द वापरतात.