मोठ्या प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने कॅफिनचे व्यसन जडू शकते. यापासून मुक्त होणे खूप कठीण आहे.
ब्लॅक कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते. यामुळे तुमचा मेंदू सक्रिय होतो ज्यामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडू शकते.
ब्लॅक कॉफीमध्ये असलेले ॲसिड आणि कॅफीन ॲसिडिटी, गॅस आणि इतर पचन समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यामुळे हृदयाची गती वाढू शकते. याचमुळे हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी कॉफीचे सेवन धोकादायक ठरू शकते.
गर्भवती महिलांनी ब्लॅक कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन करावी किंवा जमल्यास अजिबात सेवन करू नये. कारण याचा वाईट परिणाम बाळाच्या विकासावर होऊ शकतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)