इंग्रजी शाळेत जाऊनही मुलं इंग्लिश बोलत नाही, घरी लागू करा 'हे' 5 नियम

पालक मुलांकरिता शाळा निवडताना पहिल प्राधान्य हे इंग्रजी शाळांना देतात. कारण आता इंग्रजी शाळा मुलांच्या भविष्याची गरज बनलेली आहे. या भाषेशिवाय आपल्या मुलाचं काहीच अडू नये असं पालकांना वाटतं.

पालकांना पडतो प्रश्न

पालकांना इंग्रजी येत नाही पण तरी देखील मुलांना इंग्रजी शाळेत घातलंय असा अनेक पालकांचा अनुभव आहे. अशावेळी मुलांनी संवाद कसा साधायचा हा पालकांना प्रश्न पडतो.

मुलांनी इंग्रजी बोलावं

अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेतात. मात्र त्यांचा अनुभव असा असतो की, मुलं इंग्रजी शाळेत जाऊन इंग्लिश बोलत नाहीत. ते हिंदी किंवा मराठी भाषेत बोलणं पसंत करतात. अशावेळी पालकांनी काही नियम घरी लागू करावेत.

इंग्रजी चॅनल्स

हल्ली मुलं लहानपणापासूनच सर्रास मोबाईल बघतात. अशावेळी पालकांनी थोडं अलर्ट राहून मुलांना इंग्रजी युट्यूब चॅनल्स पाहायला लावणे गरजेचे आहे. मुलं काय पाहतात? याकडे पालकांच विशेष लक्ष असावं.

स्वतः इंग्रजीत बोला

मुलाने आत्मविश्वासाने इंग्रजी बोलावे असं वाटत असेल तर त्यासाठी स्वतः मुलांशी इंग्रजी भाषेत संवाद साधा. यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढेल.

पुस्तकांची मदत घ्या

अनेक इंग्लिश भाषेतील कॉमिक्स किंवा कार्टून पुस्तके तुम्हाला इंग्रजी सुधारण्यास मदत करतात. चित्रांद्वारे भाषा शिकणे मुलांना सोपे होऊन जाते.

मुलांना रोखू नका

मुलं इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडून 100% शुद्ध इंग्रजी बोलण्याची अपेक्षा करू नका. अनेक पालक मुलांना बोलता बोलता रोखतात किंवा इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करतात, पण ही चूक अजिबात करु नका.

खेळातून शिकवा

पालकांनी मुलांशी वेगवेगळे खेळ खेळताना इंग्रजीची मदत घ्यावी. जसे की, गोष्ट सांगून झाल्यावर नवे चार शब्द शिकवावेत. किंवा A ते Z या अक्षरांपासून नवनवे शब्द तयार करण्यास सांगावे. प्रत्येक रॅपर किंवा प्रवासा दरम्यान दिसणाऱ्या इंग्रजी शब्दाचा उच्चार करायला लावावा.

तुलना करू नका

पालकांनी कधीच मुलांची तुलना करु नये. कारण प्रत्येक मुल वेगळ असतं. मुलांशी मुलांप्रमाणेच वागावे निरागस आणि निर्मळ.

VIEW ALL

Read Next Story