मुंबईत जरी थंडी नसली तरी राज्यात इतर ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे.
अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मोजे, टोपी आणि हातमोजे घालतात. अगदी रात्रीदेखील असंख्य लोक स्वेटर घालून झोपतात.
रात्री स्वेटर घालून झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक याबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे ते जाणून घ्या.
रात्री स्वेटर किंवा इतर उबदार कपडे घालून झोपल्याने रक्तदाब वाढण्याची भीती असते.
खूप उबदार कपडे घालून झोपल्याने घाम येतो, ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होऊन तुम्हाला अस्वस्थ वाटतं.
रात्री उबदार कपडे घालून झोपल्याने शरीरातील हवेचा दाब कमी होतो, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढण्यास मदत होते. जे तुमच्यासाठी घातक ठरतं.
जे लोक दीर्घकाळ स्वेटर घालून झोपतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची भीती असते असं तज्ज्ञ सांगतात.
रात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी रजाई आणि ब्लँकेट इत्यादींचा वापर करणे योग्य आहे. हलके उबदार कपडे घालू तुम्ही झोपू शकता. मात्र खूप जास्त किंवा जड स्वेटर घालून झोपणं तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)