मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात.
मात्र हिवाळ्यातही योग्य टिप्स फॉलो करून केसांना मेंदी लावल्यास आजारपण येणार नाही.
हिवाळ्यात केसांना मेंदी लावताना उन्हात बसून लावण्याचा प्रयत्न करा. मेंदीचा लेप गरम पाण्यात तयार करा ज्यामुळे तुम्हाला सर्दी होणार नाही.
उन्हात बसून केसांना मेंदी लावू शकत नसाल तर घरात गरम पाण्याच्या वाफेवर मेंदीचा लेप ठेवा आणि मग तो केसांवर लावा. ज्यामुळे आजारी पडणार नाही.
तुम्ही केसांना मेंदी लावल्यावर हेअर ड्रायरचा वापर करून ती सुकवा. ज्यामुळे तुम्हाला सर्दी होणार नाही.
केसांवर लावलेली मेंदी सुकल्यावर गरम पाण्याऐवजी केस नॉर्मल पाण्याने धुवावीत. कारण थंड आणि उष्णता अशा संमिश्रतेमुळे तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता असते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)