सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या जोडीदाराला वेळ देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे.
लग्नानंतर आपल्या पार्टनर सोबत फिरायला जाताना आपण खूप उत्साही असतो.
उत्साहाच्याभरात आपल्याकडून पार्टनर दुखावला जाऊ शकतो. याचं कारण तुमच्या 'या' सवयी ठरु शकतात.
त्यामुळे आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करायचा असेल तर या गोष्टी करु नका.
आज काल फोटो काढणं ही एक मुलभूत गरज असल्याचं दिसत आहे. कुठेही गेल्यावर प्रत्येक गोष्ट फोटोमध्ये साठवून ठेवणं जरी गरजेचं असलं तरी आपल्या खास व्यक्तिसोबत फिरायला गेल्यावर सतत फोन मध्ये राहिल्यानं तुमचा स्पेशल टाइम खराब होउ शकतो.
अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या, मळमळ यांसारखे त्रास होतात. अश्यांवेळी जोडीदारासोबत प्रवास नकोसा वाटतो. त्यामुळे प्रवासात तुम्ही लिंबू, चॉकलेट- गोळ्या, किंवा काही औषध असतील तर सोबत ठेउ शकता.
काहीवेळा अनेक लहान गोष्टींवरून चिडचिड होऊ शकते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही कि, लगेच चिडू नका.जोडीदाराच्या आवडीनिवडी लक्षात घ्याफिरायला कुठे जायचं हे ठरवताना आपल्या जोडिदाराच्या मताचा आदर करा.
आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा. त्यासाठी सहसा गर्दिचे ठिकाण टाळा.