मुलीच्या लग्नानंतर प्रत्येक आई-वडिलांना काळजी असते की मुलगी सासरी सुखी राहिल का?
मुलीला लग्नानंतर सासरी पाठवताना काही वस्तू आशीर्वाद म्हणुन भेटवस्तू दिल्या जातात.
यामध्ये अशा काही वस्तू आहेत त्या पाठवणीच्या वेळी मुलींना देणं अशुभ मानलं जातं.
मुलींना पाठवणीत कैची ,सुरी, चाकू यांसारख्या धारदार वस्तू भेट देणं चुकीचं म्हटलं जातं. यामुळे संसारात कटुता येते.
हिंदू धर्मानुसार झाडू म्हणजे घरची लक्ष्मी मानली जाते. लग्नात मुलींना पाठवणीच्या वेळी झाडू दिल्यानं दोन्ही घरांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
मुलींना निरोपाच्या वेळी चुकूनही लोणचं देऊ नका. याचं कारण म्हणजे त्याची चव आंबट असून ती मुलीला लग्नात भेट देणं अशुभ मानलं जातं.
जर तुम्ही मुलीला भांड्यामध्ये चाळण देत असाल तर ते चुकीचं मानलं जातं. यामुळे मुलीच्या संसारात ताणतणाव निर्माण होऊ शकतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)