थंडी असो किंवा उन्हाळा त्वचा हाइड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी कोणतंही केमिकल प्रॉडक्ट न वापरता घरच्या घरी नैसर्गिकपणे फेस टोनर कसा बनवायचा ते पाहूया.
गुलाब पाण्याला नैसर्गिक टोनर म्हटलं जातं. गुलाब पाणी थंड असून त्याने त्वचा कोरडी होत नाही.
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण मुबलक असतं. वजन कमी करण्याबरोबरच त्वचेसाठी काकडी फायदेशार ठरते. काकडीचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचेचं Texture सुधारतं. नैसर्गिकरित्या त्वचेला मॉईश्चर मिळतं.
कोरफडीचा गर , गुलाब पाणी आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करून हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यला लावल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
ग्रीन टीमध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर असते. त्वचेच्या आरोग्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टी, निलगिरीचं तेल एकत्र करून फेस टोनर म्हणूनही याचा वापर करता येतो.
उकळलेल्या पाण्यात संत्र्याची साल एकत्र करून 10 मिनिटं तसचं ठेवा. पाणी थंड झाल्यावर त्यात व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करून हे मिश्रण टोनर म्हणून वापरू शकता.