आपली एक स्वत:ची कार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.
कार घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागल्यास अनेकजण बॅंकांची दारं ठोठावतात.
देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक एसबीआय कार लोनसाठी 9.20 टक्के ते 10.15 टक्के व्याजदर ऑफर करते.
इलेक्ट्रीक कारसाठी एसबीआय ग्रीन कार लोन अंतर्गत 9.10 टक्के ते 9.80 टक्के व्याज घेते.
दुचाकी लोनसाठी 13.35 टक्के ते 14.85 टक्के व्याज दर मिळतो. ईव्हीवर रेटमध्ये 0.50 टक्के सूट मिळते.
जर तुमचा क्रेडीट स्कोर चांगला असेल तर कार लोन वर कमी व्याज दर मिळेल.
एसबीआयवर 9.15 टक्के दराने 5 वर्षांसाठी 10 लाख रुपये दराने कार लोन घेतल्यास, महिन्याला 20,831 रुपये ईएमआय बसेल.
या कर्जात तुम्ही 5 वर्षांसाठी साधारण 2 लाख 49 हजार 874 रुपये व्याज भरता.