सोप्या Tips

खव्यातील भेसळ ओळखायची तरी कशी? पाहा सोप्या Tips

Nov 06,2023

खव्याची मिठाई

दिवाळीत गोडाच्या पदार्थांसाठी बाजारातून सर्रास खवा आणला जातो. किंवा मग खव्याची मिठाई तरी आणली जाते. पाहुणेही येताना एखादी मिठाई आणतातच.

सावधगिरी गरजेची

सध्या मात्र ही मिठाई खरेदी करतानाही सावधगिरी बाळगली जाणं गरजेचं आहे. कारण, सध्या भेसळयुक्त खवा बाजारात विक्रीसाठी आणला गेला आहे.

अस्सल खवा...

खवा अस्सल आहे हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम तो अंगठ्याच्या नखावर लावून पाहा. तो अस्सल असल्यास त्यातून तुपाचा सुगंध येईल जो दीर्घ काळासाठी टीकेल.

खव्याचा गोळा

खवा तळहातावर घेऊन त्याचा एक गोळा बनवण्याचा प्रयत्न करा. हा गोळा एकसंध न राहता तुटू लागल्यास तो खवा भेसळयुक्त आहे हे लक्षात घ्या.

रंग बदलतोय?

अर्धा चमचा खवा थोड्या गरम पाण्यात मिसळून तो थंड करा, त्याचा रंग निळसर झाल्यास तो भेसळयुक्त आहे हे लक्षात घ्या.

सजग राहा

थोडक्यात अगदी सहजपणे तुम्ही खव्याची चाचणी करु शकता. त्यामुळं या दिवाळीत सजग राहा आणि सण साजरा करा.

VIEW ALL

Read Next Story