घराच्या अंगणात अ‍ॅव्होकॅडोची लागवड कशी करावी ?

अ‍ॅव्होकॅडोचं सेवन करणं फायदेशीर आहे असं डॉक्टर कायमच सांगतात. अ‍ॅव्होकॅडोतील पोषक घटकांमुळे अनेक शारीरिक व्याधींवर अ‍ॅव्होकॅडो गुणकारी मानलं जातं.

ल्या काही वर्षांत अ‍ॅव्होकॅडोला बाजारात खूप मागणी आहे. जर तुम्हाला ही अ‍ॅव्होकॅडोचं झाड घराजवळ लावायचं असेल काय करावं हे पाहूया.

असं म्हणतात की फळाच्या गुणवत्तेवरुन त्याच्या बिया कशा असतील हे कळतं. म्हणूनच जर तुम्ही घरी अ‍ॅव्होकॅडोची लागवड करणार असाल तर बाजारातून विकत घेताना पारखून घ्या.

अ‍ॅव्होकॅडोवर काही कीड तर लागली नाही ना हे तपासून मगच खरेदी करा.

अ‍ॅव्होकॅडोचे दोन भाग करताना त्याची बी कापली जाणार नाही याची काळजी घ्या. ही बी कोमट पाण्यात स्वच्छ करा.

अ‍ॅव्होकॅडोची बी ओल्या रुमालात गुंडाळून सुर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी ठेवा.

काही दिवसांनी त्याला कोंब येण्यास सुरुवात होते. हळूहळू या रोपाला पानं फुटायला लागली की काचेच्या भांड्यात हे रोप ठेवा.

या रोपाची मूळं पूर्णपणे पाण्यात बुडतील इतकं पाणी या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे रोप सूर्यप्रकाशाच्या दिशेला ठेवा.

भांड्यातल्या पाण्यावर मच्छरांनी अंडी घालू नये आणि किटक येऊ नये म्हणून दरदिवशी यातलं पाणी बदला.

अ‍ॅव्होकॅडोच्या मुळांची एक इंचाइतकी वाढ झाली की, त्यांची जमिनीत लागवड करा.

अ‍ॅव्होकॅडोचं रोप जमिनीत लावताना त्याची मूळं बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.

VIEW ALL

Read Next Story