कोणत्या नारळात जास्त पाणी आहे कसं समजणार?
नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशी आहे.
जास्त पाणी असलेलं गोड नारळ कसं विकत घ्यायचं याबद्दल आम्ही तुम्हाला युक्त्या सांगणार आहोत.
नारळ विकत घेण्यापूर्वी ते हलवा आणि आतून येणाऱ्या आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
जास्त पाणी असल्यास जास्त तीव्र आवाज येतो आणि कमी पाणी असल्यास आवाज खूप संथ असतो.
नारळाचा रंगदेखील आत असलेल्या पाण्याबद्दल सांगू शकतो.
ज्या नारळाचा रंग तपकिरी होऊ लागला तर समजा त्यात पाणी कमी आहे.
जास्त पाणी असलेला नारळ हा बाहेरुन हिरवागार असतो.
लक्षात ठेवा की तुम्ही फक्त मध्यम आकाराचा नारळ घ्या. खूप मोठा किंवा खूप लहान नारळ घेऊ नका.