ब्रेडपेक्षाही सॉफ्ट होतील चपात्या, पीठ मळताना मिसळा 'या' गोष्टी

भारतीय जेवणात चपाती हा एक महत्वाचा पदार्थ असतो. गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या चपातीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

चपातीचं पीठ मळताना किंवा चपाती शेकवताना जरा जरी चूक झाली तर चपात्या कडक होतात. तेव्हा चपात्या सॉफ्ट बनाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

चपाती जर सॉफ्ट व्हावी असेल वाटत असेल तर त्यासाठी लागणारे पीठ नीट मळणे गरजेचे आहे. चपातीचं पीठ मळताना अधिकतर गरम पाण्याचा वापर करावा.

चपातीचं पीठ मळताना त्यात एक ते दोन कप कोमट पाणी तसेच हवे असल्यास काही चमचे कोमट तेल सुद्धा घालू शकता.

चपाती सॉफ्ट बनाव्यात यासाठी तुम्ही पीठ मळताना त्यात दही सुद्धा टाकू शकता. परंतू दहीचा वापर करताना ते जास्त आंबट आणि थंड नसावे याची काळजी घ्या.

चपाती सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही पीठ मळताना त्यात तूप सुद्धा टाकू शकता. पीठ मळताना एक चमचा तूप आणि पाणी मिसळल्यास चपात्या मऊ होतील.

चपातीसाठी पीठ नीट मळून झालं की एक सुती कपडा ओला करून तो नीट पिळून घ्यावा. मग मळलेल्या कणकेच्या गोळ्यावर पसरवून टाका. अशा प्रकारे पीठ जवळपास 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवावे आणि मग त्याच्या चपात्या बनवायला घ्या.

चपात्या सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही यात बेकिंग सोडा सुद्धा मिक्स करू शकता. एक ते दोन कप दूध आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून गव्हाचे पीठ मळून घ्या. मग पिठाचा गोळा 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story