पेजरला बीपर म्हणूनदेखील ओळखलं जातं.हे एक छोटे पोर्टेबल, इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे.
याचा उपयोग शॉर्ट मेसेज किंवा अलर्ट पाठवण्यासाठी किंवा रिसिव्ह करण्यासाठी होतो.
सर्वसाधारणपणे याचा उपयोग मेसेज पाठवणे किंवा स्वीकारण्यासाठी होतो.
बहुतांश पेजर बेस स्टेशन किंवा सेंट्रल डिस्पॅचने रेडियो फ्रिक्वेन्सी मॅच करुन मेसेज रिसिव्ह केला जातो.
हे मेसेज न्यूमॅरिक, जसे की फोन नंबर, किंवा अल्फान्यूमरिक सारखे टेक्स असू शकतात. या डिवाइसच्या छोट्या स्क्रिनवर अलर्टप्रमाणे मेसेज येतो.
मेसेज पाठवण्यासाठी टू वे पेजर्सचा वापर होतो.
हे एक टेक्स मेसेजप्रमाणे आहे. यूजर्स सेंडरकडे रिप्लायसाठी मेसेज पाठवतात.
जेव्हा मेसेज येतो तेव्हा पेजरची टोन वाजते. आजुबाजूला जास्त गोंधळ असतो, अशावेळी याचा अधिक वापर केला जातो.