जर तुम्हाला कोंडयाचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय करा. याशिवाय यामुळे केसांना बळही मिळेल.
आजकाल केसातील कोंड्याची समस्या खूप वाढली आहे. अनेक लोक याने त्रस्त आहेत.
कोंड्याची समस्या दिवसेंदिवस अनेकांमध्ये वाढत आहे आणि बहुतेक महिलांना याचा जास्त त्रास होतो.
कोंड्यापासून आराम मिळवण्यासाठी बेकिंग सोडा हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे.
तुम्हाला तुमचे केस ओले करावे लागतील, त्यावर बेकिंग सोडा लावा आणि मसाज करा.
बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घ्या आणि त्याने केस धुवा.
बेकिंग सोड्यासोबत खोबरेल तेल वापरून कोंडा कमी करता येतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)