फक्त मेसेजच नव्हे तर व्हॉट्सअॅपमधुन आपण फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा एकमेकांना शेअर करु शकतो.
परंतु, व्हॉट्सअॅपमधुन फोटोज शेअर करताना क्वालिटीसंदर्भात अडचणी येऊ शकतात. व्हॉट्सअॅपमधुन फोटो शेअर करताना बऱ्याचदा फोटो आपल्या मूळ आकारात शेअर होत नाही.
जर तुम्हाला व्हॉट्सअॅपमधुन चांगल्या क्वालिटीचा फोटो शेअर करायचा असेल तर या पद्धतीचा वापर करुन चांगल्या क्वालिटीचा आणि मूळ आकाराचा फोटो तुम्ही शेअर करु शकता.
व्हॉट्सअॅप उघडून ज्यांना तुन्हाला फोटो पाठवायचा आहे ते चॅट उघडा.
यानंतर चॅट बारवर असलेल्या पेपर आयकॉनवर क्लिक करुन तिथे असलेल्या डॉक्यूमेंट ऑप्शनला सिलेक्ट करा.
यानंतर जो फोटो तुम्हाला शेअर करायचा आहे तो फोटो सिलेक्ट करा.
फोटो सिलेक्ट केल्यानंतर तिथे असलेल्या सेंड बटनावर क्लिक करा.
या पद्धतीने फोटो पाठवल्यानंतर तुमचा फोटो अगदी मूळ स्वरुपात शेअर होईल आणि फोटोची गुणवत्ता सुद्धा कमी होणार नाही.