घरच्या घरी मध साठवून ठेवताना नेमकं काय करावं? जाणून घ्या...
घरात मध काचेची बरणी किंवा स्टीलच्या एखाद्या डब्यात ठेवावं. मधाची बरणी शक्यतो कोरड्या जागी ठेवावी.
मधाच्या बरणीला बाष्प लागणार नाही याची काळजी घेत तो कायम हवाबंद ठेवावा. मधाची बरणी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी.
मधाच्या बरणीत कधीच ओला चमचा वापरू नका, असं केल्यास मध खराब होऊ शकतं.
मध अशा ठिकाणी ठेवा जिथं तापमानात मोठे चढ-उतार होत नाहीत.
मध कायम थंड ठिकाणी ठेवावं. पण, ते अधिक थंड जागी म्हणजे फ्रिजमध्ये मात्र ठेवू नये.
मध खरेदी करताना ते अस्सल आहे याची खात्री पटवून घ्या आणि ते कायम व्यवस्थित ठेवा, अन्यथा ते लवकर खराब होण्याचा धोका असतो.