तुम्ही अनेकदा शर्टाच्या मागे शोल्डर लाइनजवळ मध्यभागी एक पट्टी शिवलेली पाहिली असेल. अगदी फोटोत दिसतेय तशीच, हो की नाही?
पण शर्टवर ही पाठीमागे ही अशी पट्टी का शिवलेली असते तुम्हाला माहितीये का? या पट्टीला एक खास नाव आहे हे तरी तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल जाणून घेऊयात...
ज्या शर्टांच्या पाठीमागे या अशा पट्ट्या असतात त्या शर्टांना बटन-डाऊन शर्ट असं म्हणतात. तर या पट्टीला 'लॉकर्स हूक' असं म्हटलं जातं. त्यामुळे पट्टी पट्टी म्हणायचं बंद करुन याला आता लॉकर्स हूक म्हणत जा.
ही पट्टी काही फॅशनचा भाग नसून प्रत्यक्षात त्याचा वापर केला जायचा. नंतर जहाजांचा आकार वाढला पण या पट्ट्या शर्टांच्या पाठीवर कायम राहिल्या. या पट्ट्या 1960 नंतर मेन स्ट्रीम फॅशनमध्ये आल्या.
नंतर GANT कंपनीने या पट्ट्यांचा वापर विद्यार्थ्यांना शर्ट विकण्यासाठी केला. या पट्ट्याच्या मदतीने शर्ट कमी जागेत आणि व्यवस्थित घड्या न पडता कपाटात वापरुन झाल्यावर लटकवून ठेवता येतात अशी जाहिरात करण्यात आली आणि ती हीट ठरली.
मात्र ही पट्टी शिवण्यास सुरुवात करण्याचं मूळ जहाजांवरील प्रवासात आहे. पूर्वी जहाजावर खलाशांना एकच कॉमन रुम वापरावा लागायचा. त्यावेळेस शर्ट हुकाला अडकवण्यासाठी मर्यादीत जागा असायची आणि हुकही मर्यादीत असायचे. त्यामुळेच एका हुकला अनेक शर्ट लटकवण्यासाठी या पट्ट्या शिवल्या जायच्या.
आता हँगर्स आणि नवीन तंत्रज्ञान आल्यानंतरही अनेक शर्टवर हे लॉकर्स हूक दिसून येतात. खरं तर यांचा आता फारसा वापर होत नाही. मात्र अगदी कमी जागेमध्ये शर्ट अडकवून ठेवायची असतील तर या लूपचा वापर करता येईल हे लक्षात ठेवा. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)