कोणतेही साधु तामसिक गुण असलेल्या गोष्टींपासून दूर राहतात. त्याचप्रमाणे या डाळीचं देखील ते सेवन करत नाहीत.
हिंदू धर्मावर ज्या लोकांचा विश्वास आहे ते लोक मसूरची डाळ खात नाही किंवा ते नॉनव्हेज आहे असं मानतात.
समुद्र मंथन करत असताना अमृत वाटत असतान स्वर्भानु नावाच्या एका राक्षसानं देवाचं रुप धारन करत तो अमृत प्यायला.
विष्णु देवानं त्यांच्या सुदर्शन चक्रानं त्याचं शिरच्छेद केलं पण तो मेला नाही.
त्याच्यात शरिराचा एक भाग राहू आणि केतू म्हणून ओळखला जातो.
दरम्यान, असं म्हटलं जातं की मसूर डाळीची निर्मिती ही त्याच राक्षसाच्या रक्तातून झाली आहे.
त्यामुळेच वैष्णव संत, ब्राह्मपण आणि जैन समाजाचे लोक या डाळीचं सेवन करत नाहीत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)