'संगीत देवबाभळी' मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेलं नाटक
हे नाटक यापुढेही सुरु राहणार असल्याचं भद्राकाली निर्मितीने सांगितलं आहे.
तुकोबारायांना न्याहरी नेत असताना आवलीला काटा लागतो आणि मग तो काटा विठ्ठल काढतो, या संकल्पनेवर आधारित हे नाटक
विठ्ठल आणि तुकोबा यांच्यातील निस्सिम भक्ती आणि नातं आपण अनेकदा अनुभवलं.
पण या दोघांच्या पत्नी रखुमाई आणि आवली या कशा असतील?
या दोघींच्या मनातील भावना काय असतील? हे 'संगीत देवबाभळी'त मांडलं आहे.
नाटकात आवली शुभांगी सदावर्ते आणि रखुमाई मानसी जोशी साकारत आहे.
या नाटकाचं लिखाण आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केलंय.