'कावळा उड, चिमणी उड' सारखे 5 टाईमपास खेळ

मोबाईलने लहानपण दुरावलं

इंटरनेटच्या काळात लहान मुलांच्या हाती मोबाईल आले आणि ऑनलाईन गेममध्ये मुलं व्यस्त झाली. मोबाईलमुळे मुलं बैठे खेळ, मैदानी खेळा यापासून दुरावली गेली आहेत

टाईमपास खेळ

पण ज्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळी मुलं अभ्यासाबरोबरच खेळातही जास्त रमत होती. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे पाच खेळ सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या मुलांबरोबर खेळू शकता.

अंताक्षरी

अंताक्षरी हा खेळ दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांमध्ये किंवा ग्रुपमध्ये खेळला जातो. यात 'बैठे-बैठे क्या करे...' च्या शेवटच्या शब्दावरुन गाण्याला सुरुवात होते.

दमसेराज

या खेळात दोन टीम असतात. यात एका टीमचा मेंबर दुसऱ्या टीमच्या मेंबरला कानात एका चित्रपटाचं नाव सांगतो. दुसऱ्या टीमचा मेंबर अभिनयाद्वारे ते नाव सांगतो. त्यानंतर पहिल्या टीमला ते नाव ओळखायचं असतं.

लपाछपी

या खेळाला अनेक नावं आहेत. आइस-पाईस, लपाछपी, हाईड अँड सीक अशी वेगवेगळी नावं आहेत. यात एकावर राज्य असतं आणि दुसरी मुलं लपतात. राज्य असणारा मुलगा लपणाऱ्या मुलांना शोधून काढतो.

राजा मंत्री चोर शिपाई

या खेळात कागदाच्या चार चिठ्ठ्या बनवल्या जातात. यावर राजा, मंत्री, चोर आणि शिपाई असं लिहिलं जातं आणि त्यावर पॉईंट लिहिले जातात. शिपाई नावाची चिठ्ठी येणारा चोर नावाची चिठ्ठी कोणाकडे आली आहे याचा शोध घेतो.

लगोरी

लगोरी या खेळात एकावर एक असे सात चपटे दगड ठेवले जातात. यात दोन टीम असतात. एका टीमचे सदस्य चेंडून दगड पाडण्याचा प्रयत्न करतात. दगड पडल्यास दुसरी टीम त्यांना चेंडून मारून आऊट करते.

VIEW ALL

Read Next Story