रात्रीच्या वेळी काकडी खाणं आरोग्यास घातक?

विटामिन

काकडी आरोग्यासाठी अतिशय फायद्याची. त्यामध्ये असणारे विटामिन आणि इतर पोषक घटक शरीरावर कमाल परिणाम करतात.

धोका

पण, काकडी रात्रीच्या वेळी खाणं धोक्याचं ठरू शकतं असं अनेकांचं म्हणणं. प्रत्यक्षात मात्र तसं नाही.

पौष्टीक

काकडी पचण्यास अतिशय हलकी आणि शरीरास पौष्टीक. यामध्ये असणारा पाण्याचा अंश शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतो.

आहारतज्ज्ञ

आहारतज्ज्ञ मात्र रात्रीच्या वेळी काकडी न खाण्याचा सल्ला देतात. यामागचं कारण माहितीये?

अपचन

रात्रीच्या वेळी काहींना काकडी खाल्ल्यानं अपचन आणि गॅसेसचा त्रास सतावू शकतो.

पोटाचे त्रास

काहींना काकडीच्या सेवनानंतर ढेकरही येऊ लागतात आणि म्हणून अशा व्याधी असणाऱ्या मंडळींनी रात्री काकडी खाऊ नये.

VIEW ALL

Read Next Story