बरणीत ठेवून पण कॉफी घट्ट व चिकट होते? या टिप्स आजमावून पाहा
चहानंतर सगळ्यात रिफ्रेशिंग पेय म्हणजे कॉफी. अनेकांना चहाऐवजी कॉफी प्यायला आवडते
मात्र, कॉफीची पावडर योग्य पद्धतीने स्टोअर केली नाही तर ती घट्ट होते किंवा तिची चव बिघडते .
कॉफीची चव बिघडू नये म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. पण फ्रीजमध्ये ठेवतानाही काळजी घेण्याची गरज आहे.
कॉफी काचेच्या बॉटलमध्ये ठेवण्याच्या आधी त्यात थोडे तांदुळ टाका त्यामुळं कॉफीची चव बिघडत नाही.
अनेकदा कॉफीमध्ये गाठ तयार होतात किंवा चिकट होते त्यामुळं कॉफीच्या बरणीत आधीच टिश्यू पेपर टाका आणि त्यावर थोडीची चहा पावडर टाका
कॉफी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार नसाल तर कॉफीच्या बरणीचे झाकणाला प्लास्टिकची पिशवी लावून घट्ट बंद करा
तसंच, कॉफीमध्ये कधीच चमचा टाकून ठेवू नका.