अनेकदा स्वयंपाक करताना भाजीत मीठ किंवा तिखट जास्त होतं. अशी कोणी खात नाही आणि सगळी मेहनत वाया जाते.
गरजेपेक्षा जास्त मीठ किंवा तिखट खाल्याने फक्त चव बिघडत नाही तर त्याचा आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो.
मग अशा वेळी ती भाजी फेकून द्यावी लागते. पण काही खास टीप्स वापरून तुम्ही भाजी खाण्या योग्य बमवू शकतात. चला बघूया कसे..
तिखट किंवा मीठ जास्त झाल्यास तुम्ही भाजीत दही घालू शकता. त्याने भाजीची चव चांगली टिकून राहील.
भाजीत तूप घातल्याने मीठ आणि तिखटाची तिव्रता कमी होण्यास मदत होते.
जर भाजी रस्स्याची (द्रवयुक्त) असेल तर तुम्ही त्यात पाणी घालून एकदा उकळी काढून घेऊ शकता.
भाजीत मलई (क्रीम) घातल्यास तिखट किंवा मीठाचे प्रमाण कमी होते. आणि भाजी जास्त स्वादिष्ट बनते.
याशिवाय तुम्ही भाजीत लिंबाचा रस घातल्यास मीठाचे प्रमाण कमी होईल.