आत्तापासून लग्नाचे मुहूर्त सुरू होत आहेत. सध्या प्री-वेडिंगचा बोलबाला आहे.
मुंबईतही असे काही लोकेशन आहेत जिथे तुम्ही प्री वेडिंग शूट करु शकता.
मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गेट वे ऑफ इंडिया. येथील ब्रिटिशकालीन बांधकामासमोर तुम्ही छान फोटोशूट करु शकतात.
तुम्हाला हिरवळ व निसर्ग सौंदर्य हवं असेल तर तुम्ही नॅशनल पार्क येथे फोटोशूटसाठी जागा निवडू शकता
तुम्हाला समुद्रकिनारी फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही वर्सोवा किंवा जुहू समुद्रकिनाऱ्यारी जाऊ शकता
मलबार हिल येथील व गिरगाव चौपाटीसमोर असलेल्या हँगिग गार्डनमध्येही तुम्ही प्री वेडिंग शूट करु शकता