'हे' खेळाडू राहिलेत IPL च्या जवळपास सर्वच टीमचा भाग

Pooja Pawar
Nov 15,2024

आरोन फिंच :

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच हा IPLच्या 9 टीमचा भाग राहिलेला आहे. यात RR, DD, PWI, SRH, MI, GL, RCB, KKR, KXIP टिमचा समावेश आहे.

जयदेव उनादकट :

भारतीय क्रिकेटर जयदेव उनादकट हा आतपर्यंत आयपीएलमधील 8 संघांचा भाग राहिलेला आहे. यात KKR, DD, RPS, SRH, MI,RR, LSG,RCB टीमचा समावेश आहे.

मनीष पांडे :

भारतीय फकंदाज मनीष पांडे हा आयपीएलमधील 7 संघांचा भाग राहिलेला आहे. यात MI, RCB, PWI, KKR, SRH, LSG, DC या टीमचा समावेश आहे.

दिनेश कार्तिक :

दिनेश कार्तिक याने आयपीएल 2024 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दिनेश आयपीएलमध्ये MI, GL, KKR, RCB, DD, KXIP या टीमचा भाग होता.

युवराज सिंह :

भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह हा आयपीएलमध्ये एकूण 6 संघाचा भाग होता, यात RCB, DD, SRH, MI, PWI, KXIP समावेश आहे.

रॉबिन उथप्पा :

रॉबिन उथप्पा याने 2008 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. उथप्पा आयपीएलमध्ये CSK, RR, KKR, RCB, PWI, MI या संघाकडून खेळला आहे.

इरफान पठाण :

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण आयपीएलमध्ये DD, SRH, CSK, KXIP, GL, RPS या 6 संघाचा भाग राहिलेला आहे.

पार्थिव पटेल :

टीम इंडियाचा माजी फलंदाज पार्थिव पटेल आयपीएलमधील 6 संघांचा भाग राहिलेला होता. यात SRH, CSK, Deccan, KTK, MI, RCB या टीमचा समावेश आहे.

ईशांत शर्मा :

गोलंदाज ईशांत शर्मा आयपीएलमध्ये 6 वेगवेगळ्या संघाचा भाग राहिलेला आहे.

करुण नायर :

टेस्ट क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा करुण नायर LSG, DC, RR, RCB, KKR, KXIP या संघांचा भाग राहिलेला आहे.

थिसारा परेरा :

श्रीलंकेचा माजी ऑलराऊंडर थिसारा परेरा आयपीएलमध्ये 6 वेगवेगळ्या संघाचा भाग राहिलेला आहे.

वरूण अरोरा :

वेगवान गोलंदाज वरूण अरोरा DC, GT, PBKS, KKR, RR, RCB या संघांचा भाग राहिलेला आहे.

मुरुगन अश्विन :

फिरकीपटू मुरुगन अश्विन हा आयपीएलमध्ये या 6 संघाचा भाग राहिलेला आहे. यात DC, PBKS, Pune, MI, RR, RCB या टीमचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story