बऱ्याच घरांमध्ये सासू- सुनेच्या नात्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळतं. सासू- सुनेच्या याच भांडणात पतीची मात्र पंचाईत होते. त्यामुळं काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं.
अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज जी यांच्या सांगण्यानुसार सासू आणि सुन या दोघींनीही कायमच एकमेकींच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही नात्यात आदर ठेवणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं सासू सुनेनं कायमच एकमेकांचा आदर करावा.
सुनेला सासरच्या घरी कायमच मुलीसारखी वागणूक द्यावी. जेणेकरून तिला घरात आपलेपणाची जाणीव होईल.
उणिवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. त्यामुळं न चिडता त्या व्यक्तीच्या उणिवांचा स्वीकार करा.
ज्या घरांमध्ये मतभेद असतात तिथं संवाद कमी असतो. त्यामुळं सासू- सुनेनं कायम संवाद साधावा.
ज्या नात्यांमध्ये अपेक्षा वाढतात त्यांचं आयुष्य फार कमी असतं. त्यामुळं एकमेकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. (वरील माहिती सामान्य संदर्भ आणि अमुक विचारांच्या व्यक्तींमार्फत मिळाले असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)