भाजलेला की उकडलेला कोणता मका आरोग्यासाठी बेस्ट?

पावसाळ्यात गरमागरम मक्याची कणस खायला कोणाला आवडत नाहीत.

काही जणांना भाजलेला मका खायला आवडतो तर काहींना उकडलेला मका खायला आवडतो. परंतु आरोग्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचा मका बेस्ट ठरतो याविषयी जाणून घेऊयात.

उकडलेला मका खाल्ल्याने शरीराला 100 ते 350 कॅलरीज मिळतात. यावर जर तुम्ही लिंबू पिळून खाल्ल्यास अधिक जास्त कायदे मिळू शकतात.

भाजलेला मका खाल्ल्याने 350 कॅलरीज मिळतात. परंतु मका जास्त सुद्धा भाजून खाऊ नये, यामुळे मिळणारे फायदे कमी होतात.

मका खाल्ल्याने एनर्जी मिळते तसेच पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोलमध्ये राहते.

मक्यामध्ये बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार मक्यामध्ये आढळणाऱ्या एंटीऑक्सीडेंट आणि फ्लेवोनॉयड भरपूर असते यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय, मक्यामध्ये फेरुलिक ऍसिड असते जे स्तन आणि यकृतामध्ये उपस्थित ट्यूमरचा आकार कमी करण्यात मोठी भूमिका बजावते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार उकडलेल्या मक्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि इतर निरोगी खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी असतात. तसेच फायबरचे प्रमाण सुद्धा कमी असते.

भाजलेल्या मक्यामध्ये फायबरचे प्रमाण तुलनेनं जास्त असते, तसेच यातील साखर बहुतेक जटिल स्टार्चमध्ये बदलते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

त्यामुळे उकडलेल्या मक्यापेक्षा भाजलेला मका जास्त आरोग्यदायी आहे असे तज्ज्ञांनी म्हंटलं आहे.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story