नवरा-बायकोचे 9 प्रकार असतात, तुम्ही कोणते आहात?

हम साथ साथ है!

हे नवरा बायको कायम सोबत दिसतात. प्रसंग कुठलाही असो किंवा काही करायचं असो हे दोघे सोबत असतात. म्हणून अनेक जण या जोडप्याला हम साथ साथ है फ्रेम म्हणतात.

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना

हे जोडपे असं असतात जे एकमेकांशी भांडतात पण दुसऱ्या क्षणी ते एकमेकांच्या प्रेमात असतात. मराठीत एक म्हण आहे ना, तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना. प्रेमात भांडण तर होतात ना. यातून त्यांचं नातं अधिक मजबूत होतं.

पॉवरफूल कपल

हे असं जोडपं असतं ज्यांना पाहून प्रेमावर विश्वास बसतो. या जोडप्याला पाहून प्रत्येक जण एकच म्हणतो जोडी अशावी तर अशी.

बालपणीची मैत्री

आधी मैत्री, मग प्रेम आणि आता नवरा बायको. अनेक वर्षांच्या सहवासानंतरही हे जोडपं एकमेकांच्या सहवासात कायम आनंदी असतात. त्यांचं नातं काळाच्यासोबत अधिक घट्ट होत जातं.

बेस्ट फ्रेंड

हे जोडप त्यांच्या आवडीनिवडी, नापसंती, सवयी आणि इतर अनेक गोष्टींमध्ये ते एकमेकांसोबत खूप आरामदायी असतात. ते एकमेकांपासून एक मिनिटही राहू शकतं नाही. ते भांडतात पण तेही प्रेमाने...

एकमेकांना विरुद्ध

हे जोडपं एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतात. त्यांच्या सवयी, आवडनिवड अगदी सगळ्याच गोष्टी...तरी तेदेखील त्यांच्यातील हे वेगळेपण त्यांना नातं मजबूत ठेवतात.

प्रेमात बुडालेले जोडपे

हे असं जोडपं असतं ते क्षणभरही एकमेकांशिवाय राहू शकतं नाही. ज्यांच्या भावना त्यांच्याशिवाय अख्खा जगाला माहिती असतात.

PDA जोडपं

ही अशी जोडपी असतात त्यांना आपलं नातं खासगी ठेवायला आवडतं. ते स्थळ, प्रसंग आणि माणसं पाहून वागत असतात.

ओपन रिलेशनशिप कपल

हे जोडपे पूर्ण प्रामाणिकपणे आणि स्वातंत्र्याने एकमेकांसोबत राहतात. हे जोडपे एकमेकांवर प्रेम करतात पण त्यांच्या जोडीदाराला दुसऱ्याला डेट करायचं असेल तर त्यांना त्यांना गैर वाटत नाही.

VIEW ALL

Read Next Story