अनेक घरांमध्ये दररोज नारळाचा वापर पूजेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी केला जातो.
नारळाचा पांढरा भाग काढल्यानंतर अनेक जण शेंड्या फेकून देतात. पण तुम्ही त्याचे फायदे पाहून हैराण व्हाल.
या शेंड्याचे बारीक तुकडे करून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा. काही दिवस पाण्यामध्ये ठेवून त्याचा खत बनवा.
त्यासोबतच नारळाच्या शेंड्या सुकवून बारीक करून घ्या. त्यानंतर बॉडी स्क्रब म्हणून त्याचा वापर करा.
नारळाच्या शेंड्यांपासून पक्ष्यांचे घरटे, भिंतीवरील पेटिंग आणि घराच्या सजावटीसाठी उपयोग करू शकता.
तसेच या शेंड्याचा वापर तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील करू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)