बिघडलेली लाईफस्टाईल, पौष्टिक आहाराचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपानाचा अतिरेक इत्यादींमुळे किडनीच्या आजारांचं प्रमाण वाढतं.
किडनी ही आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. चुकीच्या सवयींमुळे हा अवयव हळूहळू निकामी होऊ लागतो.
किडनी फेल होऊ लागल्यावर शरीरात त्याची लक्षण जाणवू लागतात. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.
किडनी खराब होऊ लागली की सांधेदुखी, धाप लागणे, लघवीचा रंग बदलणे, कमी लघवी होणे अशा समस्या होतात.
लघवीचा रंग बदलणे हे किडनी खराब होत असल्याचे महत्वाचे लक्षण आहे.
लघवीतील फेस हा लघवीतील प्रथिनांचे लक्षण आणि किडनी निकामी सारख्या किडनीच्या आजाराचे लक्षणं आहे.
तसेच किडनी फेल झाल्यावर डोकेदुखी होणे, अंगाला खाज सुटणे, थकवा येणे, रात्री झोपण्यास अडचण येणे, वजन कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी लक्षण जाणवू शकतात.
Disclaimer: (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)