तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते असं म्हटलं जातं.
तसंच तुमच्या विचारांचा प्रभाव हा तुमच्या व्यक्तीमत्त्वावर ही होत असतो,असं म्हटलं जातं.
प्रत्येक व्यक्ती त्याच्या अडचणींच्या वेळी हतबल होतो. त्यामुळे काही जणांना अतिविचार करण्याची सवय होऊन जाते.
प्रतिकूल परिस्थितीत व्यक्ती नैराश्येत जाऊन अतिविचार करू लागतो.
सतत अतिविचार करणारा व्यक्ती नकारात्मक विचार करू लागतो. त्यामुळे अशा व्यक्ती भुतकाळातील चुकांमुळे भविष्यकाळाच्या चिंतेत असतात.
अतिविचार करणारी माणसं लोक काय म्हणतील ,याकडे जास्त लक्ष देतात.
अतिविचार करणाऱ्या माणसांना सगळं काही परफेक्ट हवं असतं. त्यामुळे ते कृती करण्यपेक्षा जास्त अतिविचार करतात.
अतिविचार केल्याने ही माणसं कायम गोंधळलेली असतात. आपला निर्णय चुकला तर काय होईल, या भितीमुळे त्यांना निर्णय घेता येत नाही.