वारंवार वाळतेय तुळस? त्यामागची कारणं आणि उपाय पाहूनच घ्या

मंजिरी

तुळशीच्या मंजुळा किंवा मंजिरी तोडणं अतिशय महत्त्वाचं. तुळशीच्या मंजिरी वेळोवेळी तोडल्या नाहीत, तर तुळस वाळण्यास सुरुवात होते.

निर्जीव भाग

तुळशीमध्ये जितका वाळलेला निर्जीव भाग आहे तोसुद्धा वेळोवेळी तोडणं गरजेचं असतं. त्यामुळं हा भाग तातडीनं कापावा लागतो.

रोपटी

तुळशीच्या मुळापाशी इतर लहानशी रोपटी उगवून देवू नका, ही रोपटी मातीतील पोषक तत्तंव शोषून घेतात.

पाणी

गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यामुळंही तुळशीला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळं तुळशीला पाणी घालताना काळजी घेणं उत्तम.

माती

तुळस वाळू न देण्यासाठी त्यातील माती मोकळी करा, जेणेकरून त्यात ऑक्सिजनचा वावर राहील. रात्रीच्या वेळी गार वाऱ्यापासून तुळशीचा बचाव करण्यासाठी तिला कापडानं झाकून ठेवा.

किडींचा प्रादुर्भाव

हवामान बदलांसोबतच तुळशीवर किडीचा प्रादुर्भावही पाहायला मिळतो. त्यामुळं तुळशीवर कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा किंवा पाण्यात हळद मिसळून त्याची तुळशीवर फवारणी करा.

VIEW ALL

Read Next Story