Industry Expert म्हणतात, 'जास्त पगार हवाय तर 'या' 3 गोष्टी शिकून घ्या'; केवळ कष्टाने पगार वाढणार नाही

Swapnil Ghangale
Jul 13,2024

केवळ कष्टाळू असून उपयोग नाही

चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात केवळ कष्टाळू असून चालत नाही.

3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख

त्यामुळेच सध्याच्या काळात उत्तम पगाराच्या नोकरीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल बोलताना अरुणकुमार पिल्लई यांनी 3 गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे.

कोण आहेत हे पिल्लई?

अरुणकुमार पिल्लई हे नवी दिल्लीमधील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया शिक्षण आणि कौशल्य उपक्रम येथे निर्देशक म्हणून कार्यरत आहेत.

पहिलं अत्यावश्यक कौशल्य म्हणजे...

उत्तम पगाराच्या नोकरीसाठी सर्वात पहिलं आवश्यक कौशल्य म्हणजे एआयचं ज्ञान आणि डेटा अॅनलिसीस करता आलं पाहिजे.

दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिटीकल थिंकिंग असल्याचं पिल्लई यांनी सांगितलं. म्हणजेच एखादी समस्या उद्भवल्यास किंवा इतरही वेळी सारासार विचार करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये हवी.

तिसरी गोष्ट कोणती?

पिल्लई यांच्या सांगण्यानुसार उत्तम पगारासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट उत्तम संवाद कौशल्य ही आहे.

या पॉडकास्टवर दिली माहिती

पिल्लई यांनी 'फिगरींग आऊट' नावाच्या पॉडकास्टवर बोलताना या उत्तम पगाराच्या नोकरीसाठीच्या तीन आवश्यक गोष्टींबद्दल सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story