अनेकदा डिहायड्रेशनची समस्या होते. त्यामुळे डोकं दुखी आणि उल्ट्या सारख्या समस्या होतात. त्यामुळे हेल्दी खा.
प्रवास करत असताना कायम योग्य तेवढी झोप घ्या. 7-8 तास झोप घेणं गरजेचं आहे. त्यामुळे थकवा येत नाही.
ज्या वातावरणात तुम्ही जाणार आहात त्या प्रकारचे कपडे परिधान करणं गरजेचं असतं. त्यामुळे बॅग पॅक करताना कुठे जाणार आहात त्याची काळजी घ्या.
ऑनलाइन पेमेंट करणं सोप असलं तरी देखील कधीही फिरायला जाताना ऑनलाइन पेमेंट करता येईल असा विचार करु नका. त्यामुळे कॅश घेऊन जाणं गरजेचं आहे.
प्रवासाला जाताना कायम तुमच्याकडे गरज असेल ती सगळी औषध ठेवा. यामुळे अर्ध्या रस्त्यात तुम्हाला काही त्रास होणार नाही.
त्यामुळे प्रवास करताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे.