धकाधकीच्या आयुष्यात व्यग्र असणाऱ्यांसाठी 'आराम' ही संकल्पनाच लुप्त होऊ लागली आहे. पण, आराम शरीरासाठी अतीव महत्त्वाचा आहे ही बाब मात्र नाकारता येत नाही. आराम म्हणजे फक्त झोपणं, असा जर तुमचा समज असेल तर तसं नाहीये.
निवांत झोपणं, बसणं, एखाद्या व्यक्तीशी निवांत गप्पा मारणं हा झाला शारीरिक आराम.
झोपून उठल्यानंतरही जर तुमचं शरीर जड भासत असेल, काहीच नवं करण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला मानसिक आरामाची गरज आहे असं स्पष्ट होतं.
मनातील गोष्टी एखाद्या व्यक्तीला न सांगितल्यानंही दडपण येऊ लागतं. यामुळं डोकेदुखी, थकवा जाणवतो. अशा वेळी अमुक एका व्यक्तीला भावनिक आरामाची गरज असते. तर, एकाग्रतेसाठी अध्यात्मिक आरामाची आवश्यकता असते.
मनाला भावणारी कामं करण्याची इच्छा होत असल्याच तुमचं मन तुम्हाला रचनात्मक आरामासाठी खुणावतंय हे लक्षात घ्या. समाजात आपली प्रतीमा उत्तम राखणं, इतरांशी एकरुप होणं हा एक प्रकारचा सामाजिक आराम असतो.
अतिशय निवांत राहत शव आसमाप्रमाणं निश्चिंत पडून राहणं हे आरामाचं सोपं आणि गरजेचं स्वरुप आहे. काहीही न करणं, कोणताही विचार न करणं याचा या आरामात समावेश असतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)