दुकानातून केक खरेदी करताना तो फ्रेश आहे की नाही कसं ओळखावं?

Sayali Patil
Dec 17,2024

सेलिब्रेशन

ख्रिसमस, वाढदिवस, आनंदाचा कोणताही क्षण असला की घरी केक आणला जातो. हल्ली आनंद साजरा करण्याची हीच अनेकांची परिभाषा आहे.

चव

बऱ्याचदा आवडीनं आणलेला हा केक खाताना मात्र काहीजण नाकं मुरडतात. त्यातलं क्रीमच व्यवस्थित लागत नाही, चव काहीशी बिनसलेली वाटते या आणि अशा तक्रारी मग पुढे येतात.

केक फ्रेश आहे का?

इथं लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे केक फ्रेश आहे की नाही हे पाहणं. एखाद्या दुकानात गेलं असता केकवर असणाऱ्या क्रीमला तडे गेले आहेत की नाहीत हे व्यवस्थित पाहावं.

शेल्फ लाईफ

सहसा केक बनवल्याच्या दिवसापासून दोन दिवस टीकतो. पण, जर केकवरील क्रीमला तडे गेले असतील तर मात्र तो फ्रेश किंवा खाण्यायोग्य नाही हे लक्षात घ्या.

कमी दरात केक

सहसा अनेक मोठे हॉटेल किंवा मोठी दुकानं कामाच्या शेवटच्या तासांमध्ये कमी दरात केक विकतात.

पूर्ण विक्री

दिवसभरात बनवलेल्या केकची पूर्ण विक्री करून नव्या दिवसासाठी ग्राहकांना ताजे बनवलेले केक उपलब्ध करून देणं हाच यामागचा मुख्य हेतू असतो.

VIEW ALL

Read Next Story